सहकुटुंब घेतला शिरकूर्मा चा स्वाद
कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील कामयाब निवासस्थानी भेट देत नाईक कुटुंबियांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्नी सौ.नीलम राणे, चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्यासह अबिद नाईक यांच्या घरी जात सहकुटुंब शिरकुर्मा चा आस्वाद ही घेतला. नाईक कुटुंबियांची अत्यंत आस्थेने विचारपूस करत ईद च्या शुभेच्छा दिल्या. अबिद नाईक यांनी केंद्रीयमंत्री राणे यांना शाल पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर आसिफ नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना शाल पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य ऍड सावळाराम अणावकर, अबिद नाईक यांचे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, बंधू आसिफ नाईक, अनिस नाईक, हुमेरा नाईक, नजमा नाईक, इकरा नाईक, रिजा नाईक, मेहक नाईक,अली नाईक, गणेश चौगुले अमित केतकर निशिकांत कडुलकर इम्रान शेख, कुंदन हर्णे,केदार खोत आदी उपस्थित होते.















