नाटळ विभाग कायम राणेंच्या पाठीशी ; 2019 मध्ये विधानसभेला याच विभागात मला सर्वाधिक मतदान

लोकसभा निवडणुकीला राणेसाहेबांना नाटळ सांगवे मधून सर्वाधिक मतदान होणार

4 जून नंतर ना राऊत खासदार राहणार ना सोबतची टोळकी

आमदार नितेश राणेंनी केले मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ सांगवे विभाग हा कायम राणेंच्या पाठीशी राहिला आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लीड याच विभागात मला मिळाले. ह्या विभागात विकास प्रस्ताव आला की त्याला विरोध करायचे काम खासदार विनायम राऊत नि केले. विनायक राऊत यांच्या आजवरच्या सर्व खळा बैठका आणि नाटळ सांगवे विभागाचा या मेळावयातील गर्दी पहिली तर राऊत यांच्या खळा बैठका फिक्या पडल्या. 4 जून नंतर ना राऊत खासदार राहणार ना त्यांच्यासोबत असलेली टोळकी. नाटळ विभागाला संदेश सावंत आणि संजना सावंत यांच्या रुपात दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्षपद रानेसाहेबांच्या आशीर्वादाने मिळाले. या विभागला आजवर सर्वाधिक विकासनिधी आम्ही दिला आहे.येथील जनता राणे साहेबांना मानणारी आहे.घराघरात राणेंवर प्रेम करणारी जनता इथली आहे.2019 मध्ये विनायक राऊत याना आमच्याकडून पार्सल घेतलेल्यानि गैरसमज करून दिला की या विभागात लीड देऊ. पण जनतेने त्यांना धूळ चारली आहे. असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. केंद्रियमंत्री नारायण राणे यांचा नाटळ सांगवे विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा कनेडी सांगवे बाजारपेठ नजीक संपन्न झाला. त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, भाजपा अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत , सांगवे संजय सावंत, सुरेश ढवळ, दारीसते उपसरपंच संजय सावंत,विजय बोभाटे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की 4 जून ला जेव्हा मतदानाची यादी बघाल तेव्हा नाटळ सांगवे विभाग प्रथम क्रमांकावर असेल याची ग्वाही देतो. विरोधकांकडून अपप्रचार केला जाईल. मुंबईतून चाकरमानी गैरसमज पसरवायला आणले जातील. तेव्हा आवर्जून आम्हाला चर्चेला बोलवा. चांगले प्रकल्प थांबवले जातील. नरडवे धरणग्रस्तनामध्ये मोबदल्यावरून गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडी चे राज्य सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना नाटळ विभागासाठी किती विकासनिधी आणला याची माहिती द्या.

error: Content is protected !!