कमळ निशाणीवर चा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील पहिला खासदार नारायण राणेंच्या रुपात निवडून देण्याची संधी

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली (प्रतिनिधी) : जाज्वल्य देशभक्त ,तपस्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश विकासाकडे वाटचाल करत आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या रुपात आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपाचा आजवरचा पहिला खासदार निवडून द्यायचा आहे. नारायण राणे यांचा मागील 40 वर्षांचा राजकीय प्रवास सिंधुदुर्गवासीयांनी अनुभवला आहे. आदरयुक्त स्वागत सर्व ठिकाणी रानेसाहेबांचे होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासाची रेघ मोठी करून ठेवली आहे. विरोधकांकडे त्या विकास रेषेला स्पर्श करण्याएव्हढेही मुद्दे नाही आहेत. राज्य सरकारच्या महिलांना हाफ तिकीट योजनेचा फायदा होताना दिसत आहे.पुढील 25 दिवस भाजपाचा प्रचाराचा झंझावात असाच चालू राहणार आहे. संदेश सावंत यांनी सांगितल्यानुसार ग विभागातून 3 हजारांचे लीड राणे साहेबांना असणारच. पुन्हा येऊ ते विजयी मेळाव्यासाठी असे सावंत म्हणाले.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा नाटळ सांगवे विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा सांगवे बाजारपेठ नजीक संपन्न झाला.त्यावेळी सावंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, भाजपा अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत , सांगवे संजय सावंत, सुरेश ढवळ, दारीसते उपसरपंच संजय सावंत,विजय बोभाटे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!