फोंडाघाट (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन- 2023 – 24 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम. एस.) या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी प्रशालेतून ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते तर त्यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेतील ९ विद्यार्थ्यांना एन.एम. एम. एस. शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती संस्था पुणे यांच्यातर्फे मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी या समाजातील मुलांच्यासाठी सारथी शिष्यवृत्ती दिली जाते फोंडाघाट प्रशालेतील इयत्ता आठवीच्या ८वी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रशालेतील इयत्ता आठवीतील एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे
1)चिराग रवींद्रनाथ गुरव
2) कु. सानिका संदीप जाधव
3) हर्षित मनीष गांधी
4) कु.सेजल सखाराम हुंबे
5) पार्थ राजन नानचे
6) कु. मानसी महेश लाड
7) सौरव संदीप तांबे
8) कु. नेहा विजय गोसावी
9) आयुष पांडुरंग खरात
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती संस्था पुणे यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे-
1) कु.मनस्वी प्यारेलाल तळेकर
2) कु.आर्या अविनाश रासम
3) कु.वृंदा भरत मोरे
4) कु.चैताली दिलीप राणे
5) कु.सिद्धी चंद्रकांत सावंत
6) शिवम विजय सावंत
7) कु.सारा उल्हास लाड
8) कु.मैथिली मंगेश जोईल
वरील दोन्हीही शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन प्रशालेतर्फे गौरव करण्यात आला.












