बाबासाहेबांनी समग्र भारतीयांना संविधानातून सुरक्षितता दिली – अबिद नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेबांना जयंतीदिनी अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे ,संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समुच्च भारतीयांना संरक्षण दिले. बाबासाहेबांनी दिलेल्या महान घटनेवर आधारित भारताची लोकशाही बुलंद करण्याचे काम राज्यात महायुती सरकार आणि केंद्रात एनडीए सरकार करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या जयंतीदिनी अभिवादन केले. कणकवली बुद्धविहार येथे डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक तसेच कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव सतीश पाताडे, कणकवली शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, बुद्ध विहारचे सरचिटणीस कदम, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, दिपेश सावंत, उदय सावंत, व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!