शिवसेना नेते सुभाष देसाई करणार मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शिवसंवाद मार्गदर्शन मेळावा रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना नेते तथा माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत,उपनेते तथा जिल्ह्या संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,उपनेते गौरीशंकर खोत,उपनेत्या मीनाताई कांबळी,माजी आमदार उपनेत्या विशाखा राऊत,माजी आमदार तुकाराम काते, संपर्क संघटक तृष्णा विश्वासराव,युवा सेनेच्या कु.राजोल पाटील,आमदार वैभव नाईक, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, जिल्हाप्रमुख संजय पडते,पक्ष समन्वयक दीपजी बोरकर जिल्हा बँकेचे माजीअध्यक्ष सतीश सावंत,सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हा संघटक निलम पालव कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत,उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,तालुका संघटक वैदेही गुडेकर, व इतर मान्यवर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी तालुकानिहाय बेसिक,महिला, युवा सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, गटप्रमुख,बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सोसायटी सदस्य सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहवे असे आवाहन शिवसेना तालुक्याच्यावतीने करण्यात येत आहे.