कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूर यांच्या वतीने भीम जन्मोत्सव सोहळा 133 व्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिनांक 11 ते 16 एप्रिल पर्यंत सामाजिक कार्यक्रमाबरोबर महापुरुषांचे जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांचे फोटो पूजन करून भव्य दिव्य ग्रँड ओपनिंग प्रमुख पाहुणे राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले व भागातील सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे सभासद या सर्वांचा सत्कार करण्यात आला. दिनांक 12 एप्रिल रोजी महापुरुषांच्या वेशभूषा सह खरा व ज्वलंत इतिहास सांगणारा प्रबोधनात्मक कार्यक्रम माणूस प्रस्तुत हाक बाबांची हा प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखवण्यात आला जागर प्रबोधनाचा या कार्यक्रमात बुद्ध, कबीर ,शिवाजी महाराज महात्मा फुले ,बाबासाहेब आंबेडकर ,संत रविदास ,सर्व महापुरुषांच्या भूमिका सादर करून भागातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर दिनांक 13 एप्रिल रोजी स्वराज्य तालीम संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूरच्या वतीने महाआरोग्य शिबीर घेण्यात आले .यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोफत पूर्ण आरोग्य तपासनी तसेच मोफत शस्त्रक्रिया अथायु मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्यामार्फत हे शिबिर घेण्यात आले .या शिबिरासाठी भागातील डॉक्टर प्रमुख मान्यवर तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर दिनांक 14 रोजी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा ,संगीत खुर्ची ,या स्पर्धेचे बक्षीस वितरण करून सुमारे 50 गरीब गरजू अनाथ विद्यार्थ्यांना एक वर्ष पुरेल इतके शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.. तसेच दिनांक 16 रोजी भव्य दिव्य आकर्षक असा देखावा यामध्ये मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील देखावा तयार करून त्याचा इतिहास याबाबतचा देखावां डीजे तसेच पारंपरिक वाद्यांसह भव्य दिव्य मिरवणूक राजेंद्र नगर ते बिंदू चौक या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे उद्घाटन मा प्रकाश पाटील साहेब (गोकुळ संचालक), पद्मावती डेव्हलपर चे सर्व संचालक, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, पीआरपी चे जिल्हाध्यक्ष डी जी भास्कर, शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली अतिशय या मिरवणुकीत अबाल वृद्धांसह ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सामील होते नियोजनबद्ध सर्व कार्यक्रम राबवून चांगला संदेश देण्याचे काम सातत्याने स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर करत असतात यावेळी.. प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष सुखदेव बुधाळकर ,पंकज आठवले यांच्यासह जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष प्रवीण बनसोडे, उपाध्यक्ष अशोक शिवशरण ,उपाध्यक्ष चंद्रकांत शिवशरण ,सेक्रेटरी कुमार वाघमारे ,खजानिस सुरेश आठवले, सह खजानिस शुभम बुधाळकर जयंती मिरवणूक कमिटी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष अरविंद कुचेकर, उपाध्यक्ष संग्राम सोनवणे ,सेक्रेटरी साजन शिंदे, सहखजाणीस कुणाल लोखंडे, नियोजन कमिटी अध्यक्ष तानाजी गायकवाड मिसाळ ,उपाध्यक्ष गणेश कुचेकर उपाध्यक्ष कांबळे ,सेक्रेटरी महिपत क्षीरसागर ,खजाणीस समाधान भालेराव ,सचिव अभिजीत लोखंडे . तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक मलबारी अजम शेख दयानंद गालफाडे उदय कांबळे राजू शिंदे प्रवीण वाघमारे. नामदेव नागटिळे आकाश रजपूत तसेच भागातील इतर व मंडळाचे कार्यकर्ते, सभासद ,हितचिंतक, भागातील महिला मंडळ ,तरुण मंडळ, मोठ्या संख्येने उपस्थित होते….