सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोमसापच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत जान्हवी नंदकुमार दाभोलकर व दुसऱ्या गटातून गौरव आनंद कोठावळे हे दोघे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. उद्या सावंतवाडीत होणाऱ्या जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनात हे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांनी आपल्या मातोश्री सौ. मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केली होती.
या स्पर्धेत पहिल्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी द्वितीय कोमल अरविंद पास्ते कलंबिस्त हायस्कूल, तृतीय कस्तुरी हरिश्चंद्र आसयेकर मळगाव हायस्कूल, उत्तेजनार्थ कृष्णा महेश पास्ते सावंतवाडी मिलागरी हायस्कूल, आरती अजय कोठावळे इन्सुली हायस्कूल तर दुसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावी द्वितीय संचित संजीव पालकर कलंबिस्त हायस्कूल, तृतीय मयुरी महेश कारिवडेकर कारिवडे हायस्कूल, उत्तेजनार्थ अमृता अरविंद पास्ते कलंबिस्त हायस्कूल, दिव्य अनिल कोठावळे इन्सुली हायस्कूल या विजेत्या स्पर्धकांचे परीक्षण प्रज्ञा मातोंडकर, आदिती अमित सामंत, किशोर नांदिवडेकर, सो. ऋतुजा सावंत भोसले यांनी केले. तरी या सर्व विजेत्या स्पर्धकांनी व शिक्षकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष ऍड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.