अनुभव शिक्षा केंद्र आणि युवा संस्थेतर्फे अकोला येथे शेती आणि पर्यावरण विषयक युवकांची भूमिका याविषयी कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेत कोकण विभागातील युवकांचा प्रमुख सहभाग

कणकवली (प्रतिनिधी) : अकोला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषक भवन येथे शेतीविषयक, पर्यावरणीय बदल, पर्यावरणीय न्याय आणि युवकांची भूमिका ह्या कार्यशाळेचे 23 ते 25 फेब्रुवारी, 2023 कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत 14 जिल्ह्यातील 60 युवक युवतींनी सहभाग घेतला होता. यात कोकण विभागातील युवकांचा प्रमुख सहभाग राहिला. कार्यशाळेचे उद्घाटन अकोला जिल्हा फॉरेस्ट ऑफिसर अर्जुन के.आर. आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे (पीआर ओ) किशोर बिडवे, युवा समन्वयक सुरेश लूले, सचिन नाचणेकर, दुलरी परमार आणि सर्व अनुभव जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जैवविविधता आपल्यासाठी का गरजेची आहे आणि पर्यावरणाला धरून युवकांनी काय पाऊले उचलावीत, याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत कोकण विभागातील युवकांचा प्रमुख सहभाग

दुसऱ्या सत्रात डॉ. निलेश हेडा यांनी पर्यावरण बदल कसा होत आहे आणि मानवनिर्मित संस्कृती कशी पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे, पर्यावरणासोबत इतर सजीवांचे आवासपण कसे धोक्यात आले आहे आणि हे समतोल ठेवण्यासाठी युवकांची भागीदारी कशी असावी, यावर मार्गदर्शन केले. पवन मिश्रा यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे शेतीवर आणि मानवी जीवनावर या पर्यावरण बदलाचा काय परिणाम होत आहे ते विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले आणि यामुळे शेती, जमिनी, उपजीविका आणि मानवी जीवनावर कसा परिणाम घडत आहे, हे समजून सांगितले.

मार्गदर्शन करताना मार्गदर्शक

शेवटच्या सत्रात सर्व जिल्ह्यातून आलेल्या युवांचे जिल्हानुसार गट पाडून त्यांच्या जिल्ह्यात जे विकासाचे प्रकल्प येत आहेत आणि त्यामुळे शेती आणि मानवी जीवनावर जे परिणाम घडत आहेत, याविषयी युवांनी चर्चा करून मांडणी केली.

error: Content is protected !!