केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणेंमुळे देवगड तालुक्यातील युवकाला मिळाले जीवदान
माजी जि प उपाध्यक्ष आरिफ बगदादी यांचा यशस्वी पाठपुरावा
स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिद खान, फेहमीना यांचे अनमोल सहकार्य
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनामुळे देवगड तालुक्यातील नाडण गावातील चक्रेश नामदेव वारीक या 31 वर्षीय युवकावर तब्बल 40 लाख रुपये खर्चाची लिव्हर ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया विनाखर्च मुंबई येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये यशस्वी पार पडली. या ऑपरेशन मुळे चन्द्रेश हा मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष आरिफ बगदादी यांनी या सत्कार्यासाठी केंद्रीयमंत्री राणे आणि आमदार नितेश राणेंकडे विशेष मेहनत घेत पाठपुरावा केला. स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिद खान, फेहमीना मॅडम यांचे या ऑपरेशन साठी मोलाचे योगदान लाभले. देवगड तालुक्यातील नाडण येथील चक्रेश वारीक हा युवक लिव्हर च्या गंभीर आजाराने त्रस्त होता. चक्रेश याचा जीव वाचवण्यासाठी केवळ लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हाच एकमेव उपाय होता. 40 लाख रुपये खर्चाच्या लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन साठी अनेक ठिकाणी विचारणा करून देखील महागड्या शस्त्रक्रियेबाबत वारीक कुटुंबाला समाधानकारक प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेले चक्रेश वारीक यांचे कुटुंबीय अतिशय चिंतेत होते. चक्रेश याचे सख्खे बंधू श्री योगेश वारीक यांनी पडेल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. वैभव वारीक यांच्यामार्फत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आरिफभाई बदादादी यांची भेट घेत आपबीती कथन केली. आणि रुग्णाबाबतची सरविस्तर माहिती देऊन आरिफभाईंकडे मदतीची याचना केली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या आरिफ बगदादी यांनी तात्काळ केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांना वारीक कुटुंबावर ओढवलेल्या संकटाची कल्पना दिली.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राजे यांनी चन्द्रेश ला मुंबईत नेण्याचा सल्ला देत ऑपरेशन मोफत करून देण्याचा शब्द दिला. केंद्रीयमंत्री राणे आणि आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनानुसार आरिफ बगदादी यांनी स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिद खान आणि फेहमीना मॅडम यांच्याशी तात्काळ संपर्क केला. जाहिद खान यांनी सांगितल्यानुसार चन्द्रेश याला मुंबईतील एम जी एम हॉस्पिटलमध्ये 10 एप्रिल रोजी ऍडमिट करण्यात आले. 15 एप्रिल रोजी चन्द्रेश ची लिव्हर ट्रान्सप्लांट ची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली असून 20 एप्रिल रोजी त्याला डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. मृत्यूच्या दाढेतून चन्द्रेश वारीक ला बाहेर काढून जीवदान दिल्याबद्दल केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे वारीक कुटुंबीय आनंदाने ऋण व्यक्त करत आहेत.