पालकमंत्री चव्हाण ,किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेना पदाधिऱ्यांची बैठक

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागण्याचे किरण सामंत यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम

कुडाळ (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिवसेना नेते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल आराध्या मध्ये आज झालेल्या बैठकीत महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागा. राणेंच्या विजयासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घ्या असे आदेश सिंधुरत्न समिती सदस्य ,शिवसेना नेते किरण सामंत यांनी दिले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण , किरण सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवण कणकवली देवगड वैभववाडी या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल आराध्या येथे आज सकाळी 9 वाजता झाली. या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नाराजीचा पाढाच पालकमंत्री चव्हाण आणि आपले नेते किरण सामंत यांच्याकडे वाचून दाखवल्याचे समजते. शिवसेनेला विकासनिधी देण्यात केलेली कपात, सन्मानाची मिळत नसलेली वागणूक, शासकीय अशासकीय समित्यांवर नियुक्तीत डावलणे आदींसह अन्य मुद्द्यावरून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. दरम्यान पालकमंत्री चव्हाण हे अतिमहत्वाच्या कामानिमित्त मुंबईला निघून गेल्यामुळे 23 एप्रिल रोजी बैठक घेऊन नाराज असलेल्यांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा बैठक होणार असल्याचेही समजते. महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रणनीती आखण्यासंदर्भात आज सकाळी 9 वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल आराध्या येथे झाली. या बैठकीत किरण सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना महायुती चा धर्म पाळून नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कामाला लागा असे सांगितले. मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तोडगा निघाला नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडत नाराजी बोलून दाखवली. यावर चर्चेदरम्यान तोडगा निघाला नसला तरी 23 एप्रिल रोजी पुन्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समेट घडविण्यासाठी पुन्हा बैठक होणार असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!