विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी अल्पसंख्यांकांची सभा संपन्न झाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांचा निर्णय झाला पक्का महाविकास आघाडीच्या उमेदवारास विजयी करणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे महाविकास आघाडीतील सर्व अल्पसंख्यांक सेलची सभा संपन्न झाली या सभेला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारणी आणि सर्व सदस्य उपस्थित होते

ही सभा उभाठा शिवसेना पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मस्जिद भाई बटवाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी नजीर शेख अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, रियाज खान अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष, तबरेज रियाज शेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, आफरीन करोल कुडाळ माजी नगराध्यक्ष, निसार शेख अल्पसंख्यांक सचिव, अशपाक कुडाळकर कुडाळ तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक, याकूब बेग अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वेंगुर्ला, जावेद पाटणकर तालुकाध्यक्ष वैभववाडी, अहमद बोबडे काँग्रेस कार्याध्यक्ष वैभववाडी, नासिर रमदुल उपाध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्यांक, समीर लांजेकर अल्पसंख्यांक सहसचिव, रिजवाना शेख महिला अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख कुडाळ शिवसेना, यासीन खान शिवसेना अल्पसंख्यांक सदस्य, इमाम नावलेकर, सोहेल नावलेकर आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!