शिवसेना (उबाठा) पक्षाचे खा. विनायक राऊत यांच्या प्रचाराची नांदगांव तिठा येथे सभा संपन्न

खा.राऊत यांच्या उपस्थितीत हरून बटवाले यांचा शिवसेना प्रवेश

नांदगाव (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कासर्डे व बिडवाडी विभागाची सभा नांदगांव तिठा येथे संपन्न झाली.

या सभेत खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते असिफ हरून बटवाले यांचा शिवसेना प्रवेश करण्यात आला यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष कन्हैया पारकर,नागेश मोरया, निसार भाई, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख उत्तम तांबे (पंडित), उपविभाग प्रमुख तात्या निकम, यासीन खान, मंगेश लोके, उप तालुका प्रमुख प्रदीप हरमलकर, अतुल सदडेकर, उप तालुका युवासेना प्रमुख आबू मिस्त्री,असलदे शाखाप्रमुख संजय डगरे,हेमंत कांडर,रमजान बटवाले, हसीना बटवाले, ग्रामपंचायत सदस्य परब मॅडम, गवस बोबडे, इमाम नवलेकर, मोहम्मद, अफजल बटवाले, रईस बटवाले, अब्दुल नवलेकर,राजा म्हसकर,पंडित, मंगेश परब,अहमद बोबडे,जावेद पाटणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते

error: Content is protected !!