कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 मधील युवा कार्यकर्ते मंदार रावराणे,तेजस रावराणे , वैभव रावराणे, संजय रावराणे, महादेव रावराणे, रुपेश रावराणे, स्वागत रावराणे, प्रणय रावराणे, अक्षय रावराणे, सचिन रावराणे,अभय रावराणे,सुधाकर रावराणे, अमित रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी माजी जि प सभापती दिलीप रावराणे, रितेश सुतार, पदाधिकारी उपस्थित होते.












