इंडिया आघाडीचे विनायक राऊत यांचा घणाघात
सावंतवाडी (प्रतिनिधी) : मायनिंग चे उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सत्यानाश नारायण राणे आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी केल्याचा हल्लाबोल इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला. मळेवाड व अरोंदा जिल्हापरिषद गटाची प्रचारसभा सुदर्शन सभागृह मळेवाड याठिकाणी विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी ते बोलत होते.
विनायक राऊत म्हणाले की मायनिंग च्या माध्यमातून कोकणचा विनाश करण्याचा प्रयत्न या नारायण राणे यांच्या आणी त्यांचे ज्यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून होत आहेत.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,सुरेश दळवी,बाळा गावडे,जान्हवी सावंत,अर्चना घारे,अमित सामंत, इर्शाद शेख, लक्ष्मण वडले,विवेक ताम्हणकर,येंद्र परुळेकर,अण्णा केसरकर,रुपेश राऊळ आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे राऊत यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना सांगितले की शिवसेनेने तुम्हाला सगळं दिलं, राष्ट्रवादी सोडून आल्यानंतर तुम्हाला मंत्री केलं, जिल्ह्याचे पालकत्व दिलं त्याचबरोबर चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष केलं आणी हे सगळं करत असताना विनायक राऊत याने काय प्रयत्न केले आहेत ते त्या साईबाबा ला माहित आहे, तरीही तुम्ही बेईमानी केलीत. देव करो व तुम्हाला सद्बुद्धी लाभो एवढंच मी यनिमित्ताने सांगेल. आता ज्या नारायण राणे यांच्या नावाने दीपक केसरकर उदो.. उदो.. करत आहेत तेच दीपक केसरकर एकेकाळी संपुर्ण जिल्ह्यात नारायण राणे आणी त्यांच्या दोन्ही मुलांच्या दहशतीच्या विरोधात दगड फोडत फिरत होते. त्याच दरम्यान जिल्हा नियोजन च्या बैठकीतून या दीपक केसरकर ला अक्षरशः हाकलून लावलं होतं आणी त्यानंतर राणे यांच्या मोठ्या मुलाने निलेश राणे याने तर दीपक भाईंना नोकरीची गरज असेल तर त्यांनी आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून राहावे असे सांगत दिपकभाईंची खिल्ली उडवली होती आणी आज दिपकभाई त्याच राणेचा प्रचार करत आहेत मग ही लाचारी नाही तर दुसरं काय..? आणी आज स्वतःच्या स्वार्थासाठी हे नारायण राणे आणी दीपक केसरकर एकत्र येऊन पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघातील लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. असेही त्यांनी सांगितले. खरेतर ते पुढे म्हणाले की दीपक भाईंनी आता राजकीय संन्यास घेऊन मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्याची गरज आहे कारण त्याचसाठी त्यांनी आज दिढ कोटी रुपयाची वॅनिटी वॅन घेतली आहे ज्याचा फार उपयोग त्यांना होणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी जो पैसा लागतो तो एकतर खोक्यातून प्राप्त होतो किंवा लोकांच्या जमिनी हडपून त्याद्वारे कामावला जातो. मला या सगळ्या गोष्टींमध्ये रस नाही परंतु सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या विनायक राऊत ला जर तुम्ही डीवचण्याचा प्रयत्न केला तर मात्र सगळ्यांच्या कुंडल्या बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.
याप्रसंगी मोठ्याप्रमाणात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.












