५ लाखांच्या अवैध दारुसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज ची इन्सुली मध्ये कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने चौकुळ येथील एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाखाच्या दारूसह स्वीफ्ट कार असा साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री इन्सुली येथे दारू फॅक्टरीच्या परिसरात करण्यात आली. गोपाळ सुरेश गावडे (रा. नेनेवाडी) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इन्सुली तपासणी नाका येथे संशयित वाहनांची तपासणी करत असताना गावडे च्या गाडीची तपासणी केली असता वाहनांमध्ये गोवा बनावटीचे एकूण ४५ कागदी पट्ट्याचे बॉक्स असा साठा मिळून आला. याप्रकरणी गावडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. यात २लाख ५८ हजाराच्या दारूसह ५ लाखाची गाडी असा एकूण ७ लाख ५८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, तानाजी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, रणजीत शिंदे, दीपक वायदंडे आदींनी केले. अधिक तपास तानाजी पाटील करीत आहे.

error: Content is protected !!