असरोंडी हायस्कुलला माजी विद्यार्थ्यांकडुन सोलार सिस्टीम प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : सन 2001-2002 च्या दहावी बॅच कडून माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी ता.मालवण या ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळेला सोलार सिस्टिम(1kw) प्रदान करण्यात आली व लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
काळाची गरज लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेली ही देणगी अनमोल आहे.

माजी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शाळा सौरऊर्जा युक्त करण्यात आलेली कदाचित जिल्ह्यातील ही पहिलीच शाळा असावी.
अशा प्रकारचे माजी विद्यार्थी निर्माण होणे म्हणजे शाळा आणि संस्थेच्या चांगल्या कामाची पोचपावती असते. या बॅचची प्रेरणा घेवुन आणखी इतर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळेला मदत करण्याची भावना संस्था व मुख्याध्यापकांकडे व्यक्त केली आहे.

यावेळी 2001-02 बॅच मधील काही विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली. त्यांमधील काही विद्यार्थी 22 वर्षा नंतर शाळेत आले होते , शाळेविषयी त्यांच्या मनात नितांत आदर दिसत होता.

सन 2001-2002 च्या दहावी बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विजय सावंत, संस्था सचिव प्रकाश सावंत, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुशांत पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांच्याकडुन या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!