उद्धव ठाकरे विकृत वृत्तीचा माणूस
कंबरेतून वाकता येत नाही, कसे गाडणार ? गाडण्याचा दम देऊ नका ;आम्ही कृती करणारे
केंद्रीयमंत्री राणेंचा उद्धव ठाकरेंना सडेतोड गर्भित इशारा
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : दम बीम देणे काम तुमचे नाही. म्हणे आडवे आलात तर गाडू. कसे गाडणार ? त्यासाठी तुम्हाला कंबरेतून वाकता येत नाही. 20 पावले चालता येत नाही. असे नाहीय की आम्ही सोडले आणि तुम्ही सुरू केले आहे.आमच्याबद्दल असे बोलू नका. आम्ही बोलणारे नाही तर कृती करणारे आहोत असावं सडेतोड उत्तर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथील महायुती च्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला दिले. पुढे बोलताना राणे म्हणाले की माझ्या एका फोनवर राज ठाकरे कणकवलीत आले. शब्द द्यावा आणि पूर्ण करावा तो राज ठाकरे यांनी. मैत्री माणुसकी जोपासणारे राज ठाकरे आहेत. विद्यार्थी सेनेच्या काळापासून राज ठाकरेंनी राजकारण कोळून प्याले आहे.दुसरीकडे विकृती असलेले उद्धव ठाकरे आहेत . उमेदवारी देण्यासाठी उद्धव ठाकरे पैसे घेत होते. 40 आमदार पक्ष सोडून गेले. उद्धव ठाकरेंना सांभाळता आले नाही. अशा शब्दांत केंद्रीयमंत्री तथा महायुती चे उमेदवार नारायण राणे यांनी प्रहार केला. मागील 10 वर्षांत पंतप्रधान मोदींनी भारताला विकासाच्या दिशेने नेले. म्हणूनच 2030 साली भारत जगात तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक सत्ता होण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे गरजेचे आहे.कोव्हिडं काळात मोदीनि देशाला सावरले. कोव्हिडं वर लस निर्मिती करून देशवासियांना मोफत लसीकरण केले. गोरगरिबांना औषधें मोफत देण्याऐवजी 15 टक्के कमिशन घेऊन उद्धव ठाकरेंनी टेंडर मॅनेज केली. मोदींनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिले.दुसरीकडे औषधांवर कमिशन घेणारे उद्धव ठाकरे.मुद्रा योजनेत विना गॅरंटी कर्ज दिले. 11 कोटी 72 लाख मोफत शौचालय दिले. पक्की घरे दिली. आयुष्यमान भारत योजनेतून 5 लाखाचे मोफत औषधोपंचार ऑपरेशन सुरू केले.विरोधक स्वतः केलेले काम सांगत नाहीत फक्त मोदींवर टीका करतात. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी काय केले ? स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बाळासाहेबांना गर्व होता. आज सावरकरांबद्दल अपशब्द
बोलणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात.सिडकोला कोकणात एक इंचही जमीन घेऊ देणार नाही. कोकण आम्हाला आर्थिक सबळ करायचे आहे. 8 कोटी उद्योजक 18 कोटी कामगार मी उद्योगमंत्री होण्याआधी होते. आज 29 कोटी महिला उद्योजक आहेत. चिपी विमानतळ स्वतः आणल्याची थाप उद्धव ठाकरेंनी मारली.प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री असताना मी महसूल मंत्री होतो. प्रफुल्ल पटेल यांचे एक काम करून देताना मी त्यांच्याकडून चिपी विमानतळ मंजुरी घेतली. जमीन संपादन होत असताना हाच विनायक राऊत विरोध करत होता.चिपी विमानतळ बांधून झाल्यावर जमीन संपादनाला विरोध करणारा हाच विनायक राऊत स्वागत करत होता.त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या तोंडावर विनायक राऊत करत असलेल्या तोडपाणी ची पोलखोल केली. मोदींनी सांगितलेल्या 400 पार खासदारांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग चा खासदार म्हणून मी असणार म्हणजे असणार. 7 मे रोजी कमळ निशाणीला मत देऊन विकासाला मत द्या असे आवाहन राणे यांनी केले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कणकवली येथील महायुती प्रचार सभेत राणे बोलत होते.यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश जाधव ,खा.चंद्रकांत अडसूळ,आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते.