नारायण राणेंना प्रचारसभेची गरज नाही , राणे निवडून आले आहेत – राजगर्जना

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धवने भाजपावर टीका केली असती काय ?

ग्रीन रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून समर्थन

ऍमेझॉन नंतर जगातील दोन नंबरचा प्रदेश कोकण, हॉटेल इंडस्ट्री ने कोकणविकास

केवळ 6 महिन्यात मुख्यमंत्री राणेंनी सपाट्याने काम केले, 5 वर्षे असते तर आज प्रचाराची गरजच नव्हती

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझे मित्र माझे जुने सहकारी असा केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उल्लेख करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. जर आज भाजपाने अडीच वर्षे तुम्हाला मुख्यमंत्री बनवले असते तर भाजपा विरोधात बोलला असता काय ? आज तुमच्याकडून खुर्ची हिरावून घेतली म्हणून तुमच्या बुडाला आग लागली. म्हणे गुजरातला उद्योग नेतायत. साडे सात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते. तेव्हा का नाही आणले उद्योग कोकणात ? अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ने विरोध केला हे सांगतानाच राज यांनी भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांची यादीच वाचून दाखवली. भाभा रिसर्च सेंटर मुंबईत आहे. तिथे कधी स्फोट झाल्याचे ऐकिवात नाही.नाणार ग्रीन रीफायनरीला खासदार विनायक राऊत उद्धव हानी विरोध केला.मुख्यमंत्री असताना उद्धव ने बारसु ला हा प्रकल्प नेला.तिथे 5 हजार एकर जमीन कशी उपलब्ध झाली ? आधीच यांच्या लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या. यामागे इथला खासदार विनायक राऊत याचे हात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.कोकण रेल्वे याच कोकणातून गेली. गोव्यात सगळे जण फिरायला जाते. गोव्यात जे बीचवर दिसते ते कोकणात दिसले तर आमची संस्कृती खराब होते असे बोंब उठते.दोन वेळचे जेवण देऊ शकत नाही ती संस्कृती काय कामाची ? असा सवाल राज यांनी केलामाझ्या प्रचारसभेची नारायण राणेंना गरजच नाहीय ते निवडून आलेले आहेत. केवळ 6 महिने मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी झपाटलेल्या सारखी विकासकामे केली. जर 5 वर्षे मुख्यमंत्री पद मिळाले असते तर आज राणेंच्या प्रचाराची गरजच नव्हती. अभ्यासू नेता म्हणून राणेंची ओळख आहे.महाराष्ट्र राज्याला 9 भारतरत्न आहेत, त्यातील 7 भारतरत्न ही कोकणातील आहेत. कोकणी जनता ही सुजाण आणि सुज्ञ आहे. मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी ही पहिली जाहीर सभा आहे.मी सरळ चालणारा आहे. मला एखादी गोष्ट नाही पटली तर नाही, पटली ते पटली. 2014 , 2019 वेळी मोदींच्या काही गोष्टी मला नाही पटल्या.त्या आजही नाही पटत. आज विकासाच्या मुद्द्यांवर मोदींना मी पाठिंबा दिला. काश्मीर मधील रद्द केलेले 370 कलम, अयोध्येत कारसेवकांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले, त्यांची प्रेते शरयू नदीत फेकण्यात आली तेव्हापासून राम मंदिर प्रश्न भिजत पडला होता आणि आता नरेंद्र मोदींचे सरकार असताना कोर्टांकडून राम मंदिर बांधण्याची परवानगी दिली. आज नरेंद्र मोदी सरकारमुळे राम मंदिर उभे राहिले. अन्यथा राम मंदिर अशक्य होते.मित्राची खरडपट्टी काढताना आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे असता नये.जे मी 2019 मध्ये मोदीं विरोधात बोललो ते बोलायची आजच्या विरोधकांची हिम्मत नव्हती. मला भूमिका नाही पटली म्हणून मी मोदींच्या विरोधात होतो. नुसताच बाकड्यावर बसणार खासदार हवा की केंद्रात मंत्री म्हणून काम करणारा खासदार हवा हे ठरवा.मोदींच्या मंत्रिमंडळात राणे मंत्री असतील.यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश जाधव ,खा.चंद्रकांत अडसूळ,आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!