उद्या करणार मतदान
प्रलंबित रस्त्याचे काम करून देण्याचे देण्यात आले आश्वासन
खारेपाटण (प्रतिनिधी) : उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर कणकवली तालुक्यातील नडगिवे बौध्दवाडी या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या वाडीत येणारा रस्ता बरीच वर्षे न खडीकरण व डांबरीकरण न झाल्याने आपली नाराजी व्यक्त निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन पगारे कीर्तिकांत जाधव यांनी घेतला होता. परंतु नुकतेच भाजप पक्षाचे कार्यकर्ते व माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी त्यांची भेट घेऊन प्रलंबित असलेला रस्ता येत्या डिसेंबर २०२४ अखेर करून देणारा असल्याचे आश्वासन दिल्याने अखेर नडगिवे बौद्धवाडी ग्रामस्थानी मतदान. वरील बहिष्कार मागे घेतला असून उद्या सर्व नागरिक.मतदान करणार असल्याचे समजते.
याबाबत अधिक वृत्त असे नडगिवे बौद्धवाडी येथे वाडीत जाणारा रस्ता पूर्णतः हा खराब झाला असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच वाडीत जलाजीवन मिशन चे काम तसेच मंजूर बोअरवेलचे काम आदी विविध काम.प्रलंबित राहिली होती.याबवात खारेपाटण विभगातिल भाजप कार्यकर्ते रवींद्र जठार यांनी मोहन पगारे यांची भेट घेऊन सर्व प्रलंबित कामांची पूर्तता करणार असल्याचे आश्वासन दिले.व मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत मोहन पगारे यांनी आमची प्रलंबित कामे पूर्ण करून देणार असल्याचे सांगितल्यामुळे आपण मतदानावरील बहिष्कार मागे घेत असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी रवींद्र जठार, इस्माईल मुकादम,ऋषी राऊत,राजेंद्र राऊत,आदी पदाधिकारी उपस्थित होते.