कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी फोंडाघाट येथील पातड केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूकी साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बाजावल्यानंतर सर्व मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही मध्ये देशविकासासाठी मतदारांनी आपले मतदान करणे अत्यावश्यक आहे. देशाचे सरकार बनवण्यामध्ये सुजाण मतदार म्हणून आपले मतदान करणे हे मतदारांचे कर्तव्य आहे. सर्व मतदारांनी घराबाहेर पडून आपले मतदान करावे असे आवाहन आग्रे यांनी केले.