कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष , तसेच माजी नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे या दाम्पत्याने लोकसभा निवडणुकीसाठी आपले मतदान केले. फिर एक बार मोदी सरकार..अबकी बार चार सौ पार होणार असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे हे कमळ निशाणीवर लाखोंच्या मताधिकक्याने निवडून येणार आहेत. कणकवली शहरातून 1 हजार हून अधिक चे मताधिक्य नारायण राणे यांना मिळणार असल्याचा विश्वास देखील समीर नलावडे यांनी मतदानानंतर व्यक्त केला.