प्रशासनाचा चोख बंदोबस्त: महिलांची उपस्थिती लक्षनिय
आचरा (प्रतिनिधी) : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. मालवण तालुक्यातील चिंदर गावात शांततेत मतदान सुरु असून सकाळ पासून महिलां वर्गाचा उत्साह दिसत असून बूथ नं 5, 6, 7 वर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दुपारी 11.30 वाजे पर्यंत 5 नंबर बूथ वर -31%, 6 नंबर बूथवर…24% तर 7 नंबर बूथवर 27% मतदान झाले आहे. दुपार पर्यंत मतदानाची टक्केवारी कमी दिसत आहे.