महान शाळा येथील आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

मसुरे (प्रतिनिधी) : जि. प.शाळा महान कांदळगाव येथे आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता. विध्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना बरोबरच व्यवहार ज्ञानाची माहिती होणे या हेतूने सदर उपक्रम राबविण्यात आला. बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध वस्तू विकण्यासाठी आणल्या होत्या . या बाजाराचे उदघाटन महान गावाचे सरपंच अक्षय तावडे यांनी केले . यावेळी उपसरपंच अजित राणे, अंजली हळवे, प्रसाद जाधव, वैष्णवी पेडणेकर सुषमा प्रभुखानोलकर आदी पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते . या सर्वांनी खरेदीचा आनंद लुटला व सदर उपक्रमाचे आणि विद्यार्थी- शिक्षक यांचे कौतुक केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!