बुलमॅन रेकॉर्ड कंपनीचा ‘क्यू किया’ हा नवा अल्बम रिलीज

मसुरे सुपुत्र आशिष प्रभूगावकर यांचा संगीत क्षेत्रात मोठा धमाका

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे गावचे सुपुत्र आणि संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध अशा बुलमॅन रेकॉर्ड्स या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आशिष प्रभू गावकर यांनी व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी आपल्या बुलमॅन रेकॉर्ड्स या म्युझिक लेबल कंपनीतर्फे आपला नवीन म्युझिक अल्बम पंपोंस "क्यू किया" याला प्रकाशित केले आहे. यावेळी बोलताना कंपनीचे संस्थापक आशिष प्रभूगावकर म्हणालेत संगीत ही एक युनिव्हर्सल भाषा आहे.या भाषे मध्ये शब्द नसून  इमोशन हेच शब्द आहेत. म्हणूनच संगीताला आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे स्थान आहे.आज देशा मध्ये हा नवीन म्युझिक अल्बम सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. लाखो लोकांच्या मोबाईल मध्ये याच अल्बमची धून आपल्याला आज पाहायला मिळत आहे.
    
या अल्बम मधील या गाण्याचे दिग्दर्शन लॉलीपॉप असून गायक बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध गायक पापोन हे असून त्यांची अनेक गाणी ही  आज संगीत शेत्रा मध्ये खूप मोठी हिट्स राहिली आहेत. ज्यांच्यामध्ये हे मोह मोह के धागे हे प्रामुख्याने संगीतले जात आहे. या गाण्याचे गीतकार सईद कादरीजी असून ज्यांचे मर्डर वन, मर्डर टू, मर्डर थ्री, जिस्म याअली यासारखी अनेक हिट गाणी प्रसिद्ध झाली आहेत. या गाण्याचे मुझिक राज आशूजी यांना दोन वेळा म्युझिक मिरची अवार्ड मिळाली आहेत. आशिष प्रभू गावकर यांच्या बुलमॅन रेकॉर्ड या म्युझिक कंपनीने यापूर्वी अनेक हिट म्युझिक अल्बम प्रसिद्ध केलेले आहे.

   " क्यू किया " हा अलबम बुल्लमैन रेकॉर्ड चॅनेल द्वारे रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेत्री  प्रज्ञा मिश्रा, हिरो ऋषभ चव्हाण, सिंगर पापोस, लिरिक सय्यद कादरी कंपोझिशन राज आशु मास्टर मिक्सिंग यश राज स्टुडिओ अरेंजमेंट विजय दयाल डायरेक्टर लॉलीपॉप आणि नसीर खान आदि आहेत.

या अल्बम ची अभिनेत्री प्रज्ञा मिश्रा ही एक बॉलीवूड मधील मोठी अभिनेत्री असून अनेक हिट गाण्याचे अल्बम तिने दिले आहेत. तिच्या या अल्बम मधील गाण्याचे ही खूप कौतुक होत आहे. याचबरोबर या अल्बम मधील हिरो ऋषभ चव्हाण यांचेही खूप कौतुक होत आहे. या पूर्वी बुलमॅन कंपनीच्या वतीने इश्क हो गया (सलमान आली), पत्रकार है हम (शान), बारिश (अल्तमाश फरिदि) हे म्युझिक अल्बम हिट झाले होते बुल मॅन कंपनीच्या वतीने यापूर्वी अनेक हिट गाण्याचे अल्बम प्रसिद्ध केले होते.

यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळात फिल्ड वरती काम करताना ज्या पत्रकारांना कोरोनाची बाधा होऊन आपला जीव गमवावा लागला अशा सर्व पत्रकारांना मानवंदना देण्यासाठी “पत्रकार है हम” या गाण्याचा अल्बम त्यावेळी प्रसिद्ध करून हा म्युझिक अल्बम खूप हिट झाला होता. आशिष प्रभू गावकर यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे. यापूर्वी सुद्धा आशिष प्रभूगावकर यांनी सामाजिक, कला, क्रीडा,राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा देशभरात भरीव अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी संगीत क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभूगावकर यांचे ते सुपुत्र आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!