राजापूर नायब तहसिलदार दिपाली पंडीत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

भर शहरात बिबट्याची दहशत

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूरच्या नायब तहसिलदार दिपाली पंडीत या रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समीतीकडे जात असताना शहरातील भटाळी येथील पोलिस लाइन्सच्या बाजूला बिबट्याने केलेल्या हल्यात जखमी झाल्या आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तिथपासून राजापूर वनविभागाचे कार्यालय केवळ हाकेच्या अंतरावर आहे. . तर येथील नागरिकानी काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या फिरत असल्याची तक्रार केली होती मात्र वनविभागाच्या अधिकार्यांनी याकडे कानाडोळा केल्याने आज बिबट्याच्या हल्यात राजापूरच्या नायब तहसिलदारच जखमी झाल्या आहेत.

दिपाली पंडीत या मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या राजापूर पोलिस लाइन पासुन काही मिटर अंतरावर असणाऱ्या भारत बेकरीच्या भट्टीजवळ आल्या असता तेथील गडग्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यानी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यात त्या बालंबाल बचावल्या आहेत. त्यांच्या हातावर बिबट्याने पंजा मारला असुन दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान याच रस्त्याने येणाऱ्या काही पोलिसांच्या निदर्शनास त्या रस्त्यात पडल्याचे निदर्शनास आल्याने त्याना सदर पोलीसानी राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!