सम्यक साहित्य संसदेचा आबा शेवरे जीवनगौरव व उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरण सोहळा

१२ मे रोजी मराठा नाट्यगृह कणकवली येथे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्याधिष्ठित समाजरचनेची आणि क्रांतीगर्भ तत्वज्ञानाची प्रेरणा घेऊन मानवी तत्वज्ञानाचे पोषण करणाऱ्या विचारवंत,लेखक,कवी, समीक्षक यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या संस्थेकडुन दरवर्षी देण्यात येणारा कविवर्य आ.सो.शेवरे स्मृतिप्रीत्यर्थ आबा शेवरे जीवनगौरव पुरस्कार -२०२३ ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक मोतीराम कटारे यांना तर विद्रोही आंबेडकरी कवी, कार्यकर्ता उत्तम पवार स्मृती ‘उत्तम- सर्वोत्तम काव्य पुरस्कार-२०२४ हा पुरस्कार परिवर्तनशील कवी प्रा.सिद्धार्थ गोपाळ तांबे या दोन्ही पुरस्कार विजेत्यांचा सन्मान सोहळा १२ मे २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ४.००वाजता कणकवली येथील मराठा मंडळ नाट्यगृह येथे ‘भारतीय जनता’ या नियतकालिकाचे संपादक, आंबेडकरी विचारवंत मान. प्रसेनजित, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी डॉ . अनिल धाकु कांबळी, कवी ,कथाकार, वैचारिक लेखक सुनिल हेतकर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक माधव कदम , सेवानिवृत्त नगररचनाकार,कवी, कथाकार पुरुषोत्तम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष, प्रसंवाद चे संपादक इंजि.अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे. तरी सदर काव्य पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सम्यक संसदेचे कार्यवाह राजेश कदम, उपाध्यक्ष प्रा.सिद्धार्थ तांबे,कोषाध्यक्ष संध्या तांबे,माजी अध्यक्ष अरुण नाईक यांनी केले आहे.

error: Content is protected !!