फोंडाघाट बाजारपेठेतील वाहतूक कोंडी- एक डोकेदुखी

पोलीस यंत्रणा- ग्रामपंचायत- बांधकाम विभाग हतबल

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मे महिन्याच्या सुट्ट्या अन् गगनबावडा- वैभववाडी घाट बंद असल्याने, तसेच बाजारपेठेत वाहन चालकांचे आडमुठे वागणे यावर कोणाचाच वचक नसल्याने फोंडाघाट बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. तीन-चार दिवस काही तास पोलिसांनी वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. दंड ही केला. मात्र वाहतूक कोंडी रोखण्यात पोलीस यंत्रणा आणि सुशेगात ग्रामपंचायत तसेच बांधकाम विभाग हतबल ठरल्याचे दिसुन येते.त्यामूळे पादचारी- पर्यटक आणि व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!