भगवंतगड फाटा – चिंदर काजरादेव रस्ता खड्डेमय !

शेकडो वाहनांची अहोरात्र वाहतूक: अपघाताची भीती

लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?

आचरा (विवेक परब) : आचरा मालवण रस्त्यावरील आचरा भगवंतगड फाटा (शिक्षक कॉलनी) ते चिंदर काजरा देव मार्ग पूर्णतः खड्डेमय बनला आहे. सुमारे दोन ते तीन कि. मी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. वाहन चालकांना या मार्गाने प्रवास करताना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. याचा फटका या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांना बसत आहे. या मार्गाने जाणारे दुचाकी, रिक्षा, कार आदी वाहनधारक यांच्या मधून तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
हा मार्ग आचरा ते बांदिवडे मसुरे तसेच जिल्हा मुख्यालय पर्यंत जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून वाहतूक अलीकडील काळात मोठया प्रमाणात वाढली आहे. शाळा-कॉलेज, नोकरदार वर्ग, हॉस्पिटल-डॉक्टरकडे जाणारे रुग्ण या मार्गाने प्रवास करत असतात.

खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची भीती निर्माण असून लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न जनसामन्यातून विचारला जात आहे.

error: Content is protected !!