आमदार नितेश राणेंचा समितीत समावेश
मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळ हे चोरमंडळ म्हणणे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलेच भोवणार आहे. महाविकास आघाडी काळात बनवण्यात आलेली विशेष हक्कभंग समिती शिवसेना-भाजप सरकारकडून बरखास्त केली आहे. तर नव्या 15 जणांची हक्कभंग समिती घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत आमदार नितेश राणेंचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीत सत्ताधारी पक्षाचे 13, तर विरोधी पक्षाचे 2 सदस्य समितीत आहेत. या समितीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश केला आहे. राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश करण्यात आला आहे, तर राहुल कुल यांना हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवडते आहे. यानंतर समितीकडून राऊतांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, राऊत यांना ४८ तासांत उत्तर द्यावे लागणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येता विरोधी पक्षाने चहा पानावर पत्र देऊन बहिष्कार टाकला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी देशद्रोहयांसोबत चहापान करणे आपण टाळले, असे म्हटले. यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग नोटीस आणली आहे. उद्या दोन्ही नोटीसवर उपसभापती निर्णय घेणार आहेत. दोन दिवसांत चौकशी करून बुधवारी ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे
संजय राऊत यांनी विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य केले होते पावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला. विधीमंडळ हे चोरमंडळ आहे. असे धक्कादायक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला. यावर दोन दिवसांत अभ्यास करून ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.