परशुराम माईनकर यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड तर सरचिटणीसपदी रोहिदास नकाशे यांची वर्णी
तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ मुंबई ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून मंडळाच्या अध्यक्षपदी परशुराम सखाराम माईनकर यांची बहुमतांनी फेर निवड करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी रोहिदास दत्तात्रेय नकाशे यांची वर्णी लागली आहे.
मुंबई येथे संपन्न झालेल्या सभेत ही नुतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. कासार्डे विकास मंडळ मुंबई, संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मोठ्या दिमाखात कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये या शिक्षण संस्थेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे शैक्षणिक क्षेत्रात विशेष नावलौकिक मिळविला आहे. जिल्ह्यात आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून काही मोजक्याच शैक्षणिक संस्था गणल्या जातात त्यामध्ये कासार्डे विकास मंडळ, मुंबई या संस्थेचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते.अशा शैक्षणिक संस्थेची सन.२०२३ ते सन.२०२७ च्या नुतन कार्यकारिणीत विविध क्षेत्रातील अतिशय अभ्यासू सभासदांची मंडळाचे पदाधिकारी म्हणून बहुमताने निवड करण्यात आली आहे.
कासार्डे विकास मंडळ, मुंबई ची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष- परशुराम सखाराम माईनकर,
उपाध्यक्ष – गणेश पांडुरंग शेट्ये, दीपक बाळा पाताडे,ॲड. मिलिंद अर्जुन नकाशे
सरचिटणीस – रोहिदास दत्तात्रेय नकाशे,
सहाय्यक चिटणीस -सीताराम पांडुरंग कोकाटे, जयदीप बापूसाहेब खाड्ये, आनंद लक्ष्मण कासार्डेकर व प्रल्हाद देवजी पाताडे,
खजिनदार – पंढरीनाथ बाबुराव राणे,
सह खजिनदार- दयानंद दिनकर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर
कार्यकारीणी सदस्य म्हणून
बापू गणपत बंड,विलास बाळकृष्ण लाड, गजानन शांताराम शेट्ये,नंदकिशोर नाना तावडे,प्रकाश गोविंद खांडेकर,रवींद्र सीताराम पाताडे, अशोक पांडुरंग सावंत, मनोज दत्ताराम शेलार,जगन्नाथ भिकाजी पाताडे, आनंद बाळाराम राणे
आदींची बिनविरोध निवड झाली आहे.
या नुतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन केले जात आहे.