मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे जागतिक महिला दिन पार्श्वभूमीवर ‘ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य’ हा आगळा वेगळा विशेष उपक्रम राबविण्यात आला. जीवनात अनेक वेळा ताण तणाव निर्माण होत असतात. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. तणावमुक्त जीवन जगणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच धोंडी कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य मयुरी कुबल, गिरकर, श्रद्धा गुराम, सुप्रिया गुराम, संपदा वालावलकर, तलाठी नारकर, ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी कार्यक्षेत्रातील महिला बचत गटाचे अध्यक्ष, सदस्य, सीआर पी, आशा सेविका, गावातील महिला भगिंनी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत भोजणे, संकेत परूळेकर,विराज गोठणकर, केंद्र चालक सोनाली भोजणे उपस्थित होते. उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ काढून पाच महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.या भेटवस्तू सरपंच शेखर पेणकर यांनी दिल्या.तसेच या सोबत कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी सुध्दा पाच महिलांना भेटवस्तू दिल्या. सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक श्री लक्ष्मण धोंडी सरमळकर यांनी मानले.