दीपक केसरकर लोकसभा निवडणुकीचे मॅन ऑफ दि मॅच
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालकत्व दाखवून दिले
ग्रीन रिफायनरी सिवर्ल्ड प्रकल्प मार्गी लावून स्थानिकांना रोजगार देणार
कणकवली (प्रतिनिधी) : महायुती उमेदवार राणेसाहेब 48 हजार मतांनी लोकसभेला निवडून आले.आपल्या हक्काचा आणि विचारांचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या जनतेने निवडून दिला.पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की यावेळी इथला खासदार कमळ निशाणीचाच असेल. विनायक राऊत सारख्या निष्क्रिय खासदाराला घरी बसवून मोदींच्या विचारांचा खासदार निवडून देण्याचे जनतेने आधीच ठरवले होते. 40 वर्षे नारायण राणेंनी सिंधुदुर्गवासीयांची केलेली सेवा कालच्या मतदानातून पोचपावती जिल्हावासीय्यानी दिली आहे. या निवडणुकीत काही कटू अनुभवही आलेत, त्याची सव्याज परतफेड करणार. उबाठा सेनेच्या अदृश्य हातांनी रानेसाहेबांच्या विजयात हातभार लावला.देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, नड्डा साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानतो.पालकमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण नामदार रवींद्र चव्हाण यांनी दाखवून दिले. पालकमंत्री चव्हाण यांचे विशेष आभार मानतो.दीपक केसरकर हे कालच्या निवडणूकित मॅन ऑफ दि मॅच ठरले आहेत.अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी लोकसभेच्या विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. महायुती धर्म पाळतानाच प्रत्येक पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग विकासासाठी नारायण राणेंची गरज असल्याचे बोलत होते. केवळ बोलून न थांबता केसरकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून मतदान वाढवून दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. महायुती म्हणून एकजूट ठेवणे आवश्यक आहे. काही कटू अनुभव यावेळी आले त्याबद्दल महायुती च्या व्यासपीठावर बोलेन.काहींचा हिशोब चुकता करायचा आहे तो सव्याज करणार. उबाठा च्या अदृश्य हातांनी राणे साहेबांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानतो.विनायक राऊत यांनी जिल्ह्यात शिवसेना संपवण्याचे काम केले. त्याचा वचपा उबाठा च्या अदृश्य हातानी केले, त्यांचे आभार मानतो. कणकवली विधानसभा मतदारसंघात प्रथम क्रमांकाचे 42 हजार मतांचे लीड मतदारांनी दिले. त्याबद्दल कणकवली विधानसभेतील जनतेचे आभार मानतो.जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी कणकवलीत येऊन राणे कुटुंबाला शिव्या घातल्या की त्याचा वचपा जनता काढेल.विधानसभेला मला 30 हजारांचे लीड होते ते आता 42 हजारांचे झाले आहे. येत्या विधानसभेला माझे मतदार आणखी ताकदीने माझ्या पाठीशी राहतील. म्हणून विरोधकांनी मला कितीही नावे ठेवली तरी जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो असे आमदार नितेश राणे म्हणाले.