वरळीत फक्त 5 हजारांचे लीड, आदित्यला राजीनामा द्यायला सांगा
संपूर्ण कोकणात उबाठा नामशेष
उबाठा काँग्रेसच्या कुबड्यावर जिवंत ; उद्धव ठाकरेंनी 10 जनपथवर वॉचमन गिरी करावी
कणकवली (प्रतिनिधी) : संजय राजाराम राऊत कसली दिवाळी आणि आनंद साजरा करतोय समजत नाही. जेवढे भाजपचे खासदार निवडून आलेत तेवढे पण इंडिया आघाडीचे नाहीत. मोदी दीड लाखाच्या लीड ने निवडून आलेत. तुझ्या मालकाच्या मुलाच्या वरळी मतदारसंघात फक्त 5 हजारांचे लीड आहे. आधी त्याला राजीनामा द्यायला सांग, नंतर मोदींचा राजीनामा माग. 21 जागा लढवून केवळ 9 जागांवर उबाठा चा विजय झालाय. उद्धव चे तोंड काळे झाले आहे. उद्धव ने मातोश्री मधून बाहेर पडून 10 जनपथ वर वॉचमन ची नोकरी करावी. उबाठा केवळ काँग्रेसच्या कुबड्यावर जिवंत आहे. म्हणे केंद्रात सरकार बनवतो. पूर्ण कोकणात उबाठा साफ झाली आहे. राणे संपले म्हणणारे कोणत्या बिळात लपून बसले ? ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार जिंकलेत. संजय राजाराम राऊत ने सिंधुदुर्गात यावे, निवडणूक विश्लेषण काय असते हे दाखवून देतो. कोकणी जनतेने उबाठा ला हाकलून लावले आहे. कोकणात आलेल्या प्रकल्पना विरोध करण्यासाठी उबाठा पूढे होती, आता उबाठा लाच जनतेने नाकारले आहे. सी वर्ल्ड, रिफायनरी सारखे प्रकल्प आता कोकणात उभे राहणार. स्थानिक बेरोजगारांना त्यांच्या मायभूमीत कोकणातच रोजगार मिळणार. सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येतील असा विश्वाससुद्धा नितेश राणे यांनी व्यक्त केला.