काँग्रेसकडून पोस्टर्स बाजी करत ‘आता कशी वाजली घंटी…’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आमदार सतेज पाटील यांच्या बाबत बोलताना ‘घंटी’ वाजवण्याची खालच्या पातळीवरची भाषा वापरली होती. यावर आज युवक काँग्रेसकडून पोस्टर्स बाजी करत ‘आता कशी वाजली घंटी…’ असं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात युवक काँग्रेसकडून हे पोस्टर लावण्यात आले . काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा फोटो या पोस्टरवर लावण्यात आल. कोल्हापुरात या पोस्टरवरील मजकूर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

error: Content is protected !!