कचरा टाकण्यावरून आजगावकर यांचा वेंगुर्ले नगरपरिषदेवर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले नगरपरिषदचा अजब कारभार. मी उघड्यावर कचरा टाकत नसताना मला २ हजार रुपयांचा दंड बसविण्याची नोटीस काढली आहे. हा प्रकार संताप जनक असून नगरपरिषद ने माझी माफी मागावी अन्यथा अब्रुनुकसानी पोटी एक कोटी रुपयांचा फौजदारी दावा आपण न. प. च्या विरोधात दाखल करणार असा इशारा लेखी निवेदनाद्वारे वेंगुर्ले परूळेकर गल्ली येथीलदत्तप्रसाद आजगावकर यांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे.

वेंगुर्ले परूळेकर गल्ली येथे एका ठिकाणी मी कचरा टाकतो असे म्हणून मला दोषी ठरऊन दोन हजार रुपये दंड बसवीत असल्याची नोटीस वेंगुर्ले नगरपरिषद ने मला दिली. वस्तुतः सदर ठिकाणी आम्ही कचरा टाकत नाही तरी यांनी माझ्यावर केलेल्या आरोपामुळे माझी नाहक बदनामी झाली आहे. या प्रकरणाबाबत आजगावकर यांनी मुख्याधिकारी वेंगुर्ले यांना आज निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नगरपरिषद कर्मचाऱ्याने १२ जून रोजी मी घरी नसताना माझे वडीलांकडे हाती २००० रुपयांच्या दंडाची नोटीस दिली. सदर नोटीसीला कोणताही लिफाफा नव्हता. आपले कर्मचारी सदरची उघडी नोटीस संपूर्ण वेंगुर्ला शहरभर डंका पिटत घेऊन आले.

नोटीसीत नमुद ठिकाणी मी कधीही कोणताही कचरा टाकला नव्हता व नाही. उलट सदरचे ठिकाण माझे घरा शेजारी असून तिथे लोक कचरा टाकतात, त्याला प्रतिबंध व्हावा अशा मीच आपल्या सफाई अधिका-यांना वारंवार विनंत्या केल्या आहेत. नोटीसींबाबत आपल्या सफाई खात्याच्या मुकादम साहेबांना विचारले असता, त्यांनी असे उर्मट उत्तर दिले की, ‘आम्ही सगळ्यांनाच नोटीसा काढतो, सुक्याबरोबर ओलेही जळते.

आपल्या या प्रकारच्या कृत्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. तसेच आपल्या उघडया नोटीसीमुळे माझ्याबाबत वेंगुर्ल्यातील लोकांमध्ये असा समज झाला आहे की, मी समाजविघातक कामे करतो. या सर्व प्रकारामुळे माझ्यासारख्या सुजाण, कर्तव्यनिष्ठ व देशप्रेमी नागरीकाच्या प्रतिष्ठेला नाहक धक्का पोहचून माझी समाजात नाहक मानहानी / अब्रुनुकसानी होत आहे.

तसेच यावर कडेलोट म्हणचे तुम्ही मला कोणतीही बोलण्याची संधी वा समज न देता परस्पर मला कचरा टाकले बाबत दोषी ठरवून दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आपला हा सर्व कारभार बेकायदेशीर व मनमानी स्वरुपाचा आहे असे माझे म्हणणे आहे. सबब, ही नोटीस मिळताच माझी लेखी माफी मागावी आणि तशी माफी न मागितल्यास माझी नाहक मानहानी केल्याबाबत नुकसान भरपाई म्हणून तुमच्याकडून रक्कम रुपये “एक कोटी” वसूल होऊन मिळण्यासाठी योग्य ती दिवाणी अथवा फौजदारी कायदेशीर कारवाई करावी लागेल याची आपण कृपया नोंद घ्यावी असेही आजगावकर यांनी नोटीस मद्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!