कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीतील गुणवंतांचा १४ जुलै रोजी गुणगौरव समारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण समाज सेवा मंडळ कणकवलीच्या वतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर आद्य गोड ब्राम्हण ज्ञातीतील सन २०२३/२०२४ च्या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार दि.१४ जुलै २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता संस्थेच्या फोंडाघाट येथील ‘पूर्णानंद भवन’ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर गुणगौरव कार्यक्रमात सन २०२३-२४ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेत ८०% आणि अधिक व इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७०% आणि अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेब पदवी व पदव्युत्तर परिक्षेत ६०% पेक्षा अधिक गुण मिळविलेले, पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक तसेच सर्व स्पर्धात्मक, एन.टी.एस.व एम.टी.एस, बी.डी.एस. ऑलिम्पीयाड इ. परिक्षेत तालुक्यात १ ते ३ क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंतांसह कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य संपादित केलेले गुणवंत व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व पुरस्कार प्राप्त ज्ञाती बांधवांबा सत्कार संस्थे तर्फे करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व ज्ञाती बांधव यांनी अगत्य पूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कणकवली तालुक्यातील या ज्ञातीतील अशा गुणवंतांनी आपल्या गुणपत्रिकांच्या छायांकित प्रती बुधवार दिनांक. १० जुलै २०२४ पर्यंत खाली निर्दिष्ट केलेल्या ज्ञाती बांधवांकडे देण्याची व्यवस्था करावी. सोबत आपला संपूर्ण दूरध्वनी वा भ्रमणध्वनी क्रमांक देणेत यावा असे संस्थेच्या वतीने आवाहन करणेत येत आहे.

संपर्क १) श्री. हर्षल तथा राजुशेठ गवाणकर आप्पासाहेब पटवर्धनचौक कणकवली मोबा नं. ९४२२५८४९००

२ ) श्री. रामचंद्र रघुनाथ बावकर

स्वामी समर्थ इलेक्ट्रिक दुकान पोस्ट ऑफिसनजिक कणकवली मोवा नं. ९४२१३२२७१५

३) श्री. राजेश महादेव आजगांवकर

गजानन इलेक्ट्रिकल्स, एस.टी. स्टेंडनजिक कणकवली मोबा. नं. ९४२१२६६४६४.

४) श्री. अरूण वसंत सामंत.

भगवती प्रिंटींग प्रेस, फोंडाघाट, बिजलीनगर, मोबा नं.९४२३३००००२

error: Content is protected !!