अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या यांच्या वतीने एप्रिल / मे २०२४ या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत गायन, हार्मोनियम, कथ्थक आणि तबला या विषयांच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या संगीत विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून सलग बारा वर्षांची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल खारेपाटण दशक्रोषित त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटणच्या संगीत परीक्षेत घावघवित यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप सर, पर्यवेक्षक संतोष राऊत यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शाळेचे संगीत शिक्षक पेंडूरकर सर यांचा देखील शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी एन सी सी विभागाचे प्रमुख कापसे सर उपस्थित होते. या संगीत परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे …

१) कुमारी अनुष्का विनोद सुतार – प्रारंभिक परीक्षा – गायन – विशेष योग्यतेसह प्रथम श्रेणी
२) कुमारी तनुश्री लवेश सौंदळकर – प्रारंभिक परीक्षा – गायन – विशेष योग्यतेसह प्रथम श्रेणी
३) कुमारी तेजल सुभाष ठाकूरदेसाई – प्रारंभिक परीक्षा – गायन – विशेष योग्यतेसह प्रथम श्रेणी
४) कुमारी सोनाली विलास तांबे – प्रारंभिक परीक्षा – गायन – प्रथम श्रेणी
५) कुमारी वर्तिका विजय धुरी – प्रारंभिक परीक्षा – गायन – प्रथम श्रेणी
६) कुमारी प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई – प्रवेशिका प्रथम परीक्षा – गायन – विशेष योग्यतेसह प्रथम श्रेणी
७) कुमारी आर्या अनिल मोसमकर – प्रवेशिका प्रथम परीक्षा – हार्मोनिअम – प्रथम श्रेणी
८) कुमारी दुर्वा राजेंद्र चिके – प्रवेशिका प्रथम परीक्षा – हार्मोनिअम – द्वितीय श्रेणी
९) कुमार आयुष प्रशांत मांगले – मध्यमा प्रथम परीक्षा – तबला – प्रथम श्रेणी
१०) कुमारी राधा राजन ठाकूरदेसाई मध्यमा प्रथम परीक्षा – कथ्थक – द्वितीय श्रेणी
११)कुमारी आर्या नीलेश करांडे, प्रवेशिका प्रथम परीक्षा कथ्थक – द्वितीय श्रेणी

या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदिप पेंडूरकर सर यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे वर्षा गोवळकर मॅडम यांचे देखील मार्गदर्शन कथ्थक परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना लाभले . खारेपाटण विद्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या शास्त्रीय संगीत गायन, हार्मोनियम, तबला, कथक नृत्य या विषयांच्या मार्गदर्शनाचा उपयोग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करून गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा द्याव्यात. तीन किंवा पाच परीक्षा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्डातर्फे विशेष जादा गुण दिले जातात त्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप सर आणि संस्थेचे चेअरमन प्रवीण जी लोकरे यांनी केले आहे .

या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय सानप सर. पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!