आंबोली (प्रतिनिधी) : सावंतवाडी बेळगाव मार्गावर आंबोली नांगरतास येथे दुचाकीची बोलेरो पिकअपला धडक बसल्याने झालेल्या अपघातात गोकाक (कर्नाटक) येथील युवक जागीच ठार झाला तर एक गंभीर आहे. सदर युवक व त्याचे साथीदार आंबोलीत पर्यटनासाठी आले होते. याचवेळी दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला.
कर्नाटक गोकाक येथून हे मित्र आंबोली येथे पर्यटनासाठी येत होते. याच दरम्यान आंबोली नांगरतास फाटा येथे त्यांच्या दुचाकीची (केए ४९ – क्यू ४८२९) समोरुन येणाऱ्या बोलेरो पिकअपला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार सादिक इम्तियाज मुल्ला (१९, रा. गोकाक, कर्नाटक) हा डोक्याला जबर मार बसल्याने जागीच मृत्युमुखी झाला. तर त्याच्या सोबत असलेला तय्यब सुलतानसाहब ऊसपघाला हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील केलई रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.