चिंदर सडेवाडी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप….!
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंदर सडेवाडी येथे उद्योजक प्रकाश दिनकर मेस्त्री यांच्यावतीने मुलांना शालेयपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मेस्त्री म्हणाले आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेंचे शिक्षकांचे ऋण कधीचं फिटणारे नसून आपण सदैव शाळेसाठी सहकार्य करू. यावेळी शिक्षिका शुभांगी अमित खोत यांचा वाढदिवसही यावेळी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सिद्धेश गोलतकर, मनोज हडकर, स्वाती सुर्वे, गायकवाड मॅडम, अजिली गोसावी, मानसी गोसावी, विद्या हडकर, धनश्री गोसावी,प्रीती कांबळी, अमित कांबळी, प्रियांका वराडकर विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन शुभांगी खोत यांनी तर आभार गायकवाड मॅडम यांनी मानले.