देवगड (प्रतिनिधी) : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील कृषि दूतांचे नांदगाव येथे स्वागत करण्यात आले. ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषि दूतांची टीम ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती कृषिदूत देणार आहेत.नांदगाव येथे कृषिदुतांचे आगमन प्रसंगी स्वागत नांदगाव गावचे सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान अब्दुल गफूर साठविलकर, ग्रामसेवक मंगेश राणे, माजी सरपंच शशिकांत शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू तांबे, आणि ग्राम सदस्य विठोबा कांदळकर तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कृषि पदवीच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषि जागरुकता हा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवणार येतो.या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांचे जीवनमान, सामाजिक आर्थिक स्थर, साक्षरतेचे प्रमाण, संबंधित गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच माती परीक्षण व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन,हवामान सल्ला, बाजार भाव व आधुनिक तंत्रज्ञान या बद्दल महिती देणार आहेत.कृषि कार्यक्रम अंतर्गत शेवटच्या चार आठवड्यामध्ये विद्यार्थी कृषि आधारित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेणार आहेत. तसेच नांदगाव या गावामध्ये कृषि महाविद्यालय फोंडाघाट, अंतर्गत ग्रामीण भागातील तरुणांना कृषि-क्षेत्रातील विविध प्रकारच्या योजने बद्दल महिती देणार आहेत.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य संते सर, मोटे सर, डॉ शेलार सर, भोकरे सर, डॉ.व्यवहारे सर, प्रा.गावकर मॅडम, प्रा.पुजारी मॅडम, प्रा.लांडगे मॅडम, प्रा.पाटणकर मॅडम, प्रा. ढोले मॅडम, प्रा.किल्लेदार मॅडम व इतर विशेषतज्ञ यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. कृषिदूत रणजीतकुमार डोंबाळे, रितेश मोरे, सौरभ पिसे, गणेश भोसले, पांडुरंग मिसाळ, सौरभ पाटील, प्रज्ञेश लळित, ऋषिकेश जाधव, बालाशिवा, शिवानागेंद्र हे विद्यार्थी कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नांदगाव गावांमध्ये कार्यरत राहणार आहेत