कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन कै. केशवराव राणे यांचा १४ वा स्मृतिदिन आज गुरुवारी सकाळी ९.३० वाजता एचपीसीएल सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘ नवीन शैक्षणिक धोरण: अंमलबजावणी आणि आव्हाने या विषयावर दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. प्रा. राजश्री साळुंखे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्वांनी उपस्थित रहावे अशी आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण गावडे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा हडकर यांनी केले आहे.











