कणकवली(प्रतिनिधी):कणकवली येथील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज पहाटे पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती असून जखमी प्रवाशांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट देत जखमी प्रवाशांची विचारपूस केली. डॉक्टर व नर्स यांच्याशी चर्चा करत जखमींची उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी संकेत नाईक, सचिन आचरेकर, नितीन राऊळ उपस्थित होते.