कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी वरवडेचे सुपुत्र प्रकाश सावंत यांची तर व्हाईस चेअरमन पदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी माजी सभापती प्रकाश सावंत तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के आर धुळप यांनी काम पाहिले. संघासाठी 7 जानेवारी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत लढत झाली होती. यात सर्वच्या सर्व 15 ही जागा भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीने मिळविल्या होत्या.
गुरुवारी झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठीच्या निवडीसाठी सकाळी दहा वाजता चेअरमन पदासाठी प्रकाश सावंत व व्हाईस चेअरमन पदासाठी सुरेश ढवळ यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी पसंतीची मोहोर उमटवली. त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे सावंत, ढवळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच नूतन चेअरमन प्रकाश सावंत, व्हाईस चेअरमन सुरेश ढवळ यांचे माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी चेअरमन विठ्ठल देसाई यांनी अभिनंदन केले. यावेळी संचालक किरण गावकर, अतुल दळवी,गणेश तांबे, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट, प्रशांत सावंत, पंढरी वायंगणकर, मिथिल सावंत, सदानंद हळदीवे, लीना परब, स्मिता पावसकर, विनिता बुचडे, वरवडे सरपंच करुणा घाडीगांवकर , वरवडे माजी उपसरपंच आनंद घाडी, व्यवस्थापक गणेश तावडे, राजन परब, सुशील पारकर, कविता राणे, राजेंद्र सावंत, सायली लाडगावकर, संदीप तोरसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!