योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात अनेक योग प्रात्यक्षिकांसह वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : प्राचीन योगविद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे. योगा हे जणू भारताला मिळालेले मोठे वरदान आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरात योगाचा प्रसार केला. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे.जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो.
अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी योगा, प्राणायाम, व्यायामाचे दैनंदिन जीवनातील महत्व याबाबत विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक एस.बी.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तर योग शिक्षक व्ही एस मरळकर, क्रिडा शिक्षक एस.टी.तुळसणकर तसेच प्रशालेतील एन.सी.सी. विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनेक योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. आरोग्य व पर्यावरण यांचे मानवी जीवनातील महत्व लक्षात घेऊन आज योग दिनाच्या निमित्ताने कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व संचालक संजय जाधव यांच्या उपस्थितीत प्रशालेत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक संजय जाधव, वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक एस.बी.शिंदे, पी.एम.पाटील,पतंजली योग समिती वैभववाडी अध्यक्ष मानसी सावंत, उपाध्यक्ष विद्या पाटील, स्वराली कोलते, सोनाली लोके, सायली शिंगरे, योग शिक्षक एस.व्ही.मरळकर, एस.टी.तुळसणकर, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत.आर.एस.पी अधिकारी एम.एस.चोरगे, वाय.जी.चव्हाण प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.