कणकवली (प्रतिनिधी) : वृत्तवैकल्याचा आधार घेऊन व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा अनोखा नशाबंदी मंडळाचा उपक्रम. समाजात नेहमी बदल घडत असतात. बदल करणे परिवर्तन करणे समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे. त्यानुसार भारतीय स्त्रियांच्या जीवनात वृत्तवैकल्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या वृत्तवैकल्यांना पुराण कथांचा आधार घेऊन मनोभावे स्त्रिया उपासना करत असतात. वटपोर्णिमा हे वृत्त सुद्धा पतीचे आयुष्य वाढावे जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हे व्रत स्त्रिया करत असतात. पुरानात सत्यवानाचे प्राण वाचविण्यासाठी सावित्रीने प्रत्यक्षात यमदेवांशी युक्तिवाद मांडला. आजच्या घडीला या वृत्तवैकल्यांना नवा आयाम नवा विचार देऊन आपण वृत्तवैकल्य उपासना केली पाहिजे. यासाठीच आपण पती व्यसनाधीन असेल किंवा भविष्यात त्याला कुठलेही व्यसन लागू नये म्हणून जन्मोजन्मी निर्व्यसनी च जोडीदार रहावा यासाठी या वटपौर्णिमेचे आपण पूजन करावे. जसे सावित्रीने यमराजाकडून वचन मागून घेतले.
त्याप्रमाणे आजच्या महिलांनी सुद्धा. आपल्या समाजाकडून, शासनाकडून, राजकर्त्यांकडून निर्व्यसनी समाज घडविण्यासाठी वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्याची मागणी केली पाहिजे. तरच समाजातली व्यसनाधीनता कमी होईल आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाचाही विकास होईल असा विचार नशाबंदी मंडळाच्या वतीने अर्पिता मुंबरकर यांनी महिलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी नशाबंदी मंडळाची सिंधुदुर्ग ब्रँड अँबेसिडरअष्टपैलू अभिनेत्री अक्षता कांबळी उपस्थित महिलांना आपलं कुटुंब निर्व्यसनी ठेवण्याची जबाबदारी स्त्रियांचीच ती आपण पार पडली पाहिजे तरच आपण कुटुंबाला प्रगती कडे घेऊन जाऊ. असा संदेश दिलाप्रीती लक्ष्मीकांत पोतदार ,प्रिया सरुडकर ,पुर्वा सुतार ,शुभांगी उबाळे, शुशमा पोठफोडे, सुचिता टकले, तुप्ती टकले, भाग्यश्री रासम, विद्या जामसांडेकर, रंजत हिर्लेकर, रेशम मयेकर, संध्या आरोलकर, चारुशीला सावंत, प्रीती निग्रे, वैधही सावंत सर्व महिलांनी वडाला फेऱ्या मारत व्यसनमुक्तीची शपथ घेतली.