श्री बेस्ट शिव हनुमान ट्रस्ट शांताक्रुज, मुंबई यांचा स्तुत्य उपक्रम
आचरा (प्रतिनिधी) : जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या सभागृहात मोफत वह्या वाटप कार्यक्रम माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ यांच्या अध्यक्षते खाली नुकताच संपन्न झाला. सदर वेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री बेस्ट शिव हनुमान ट्रस्ट शांताक्रुज, मुंबईच्या वतीने देण्यात आलेल्या 68 डझन ( 816 ) फुलसाइज वह्यांचे वाटप प्रत्येक मुलाला अर्धा डझन याप्रमाणे करण्यात आले.
संस्था अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ व जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे यांच्या प्रयत्नामुळे यावर्षी प्रथमच प्रशालेला मोफत स्वरूपात वह्या मिळाल्याने श्री बेस्ट शिव हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार राणे यांना सर्व मान्यवरांनी धन्यवाद दिले. सदर कार्यक्रमाला गावचे उपसरपंच आशिष बागवे, पोलीस पाटील सिताराम सकपाळ , संस्था उपाध्यक्ष अशोक बागवे, सेक्रेटरी अरविंद घाडी , प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर सर प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन महेंद्र वारंग सर, प्रास्तावीक प्रवीण घाडीगांवकर सर यांनी केले तर आभार गोसावी यांनी मानले.