आचरा (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. जिल्हा परिषद शाळा चिंदर कुंभारवाडी येथे आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.
योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान किंवा विश्रांती असे योगाचे विविध प्रकार शिक्षक भीमाशंकर सेतसंदी यांनी मुलांन कडून करून घेतले. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा, योग, योगासने, योगसाधना यांचे महत्व, फायदे मुलांना पटवून सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सानिका चिंदरकर, शिक्षक राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.