मालवण (प्रतिनिधी) : कै.सौ.वर्षा विश्वास मोंडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विश्वास नारायण मोंडकर यांजकडून साडे तीन हजार रु.किंमतीच्या दुरेघी, चौरेघी व एकेरी वह्यांचे मालवण दांडी शाळेतील सर्व ४४ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर विश्वास नारायण मोंडकर, सचिन मालंडकर, रुपेश धुरी, कुबल, मनीषा ठाकुर, अमृता राणे, मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, राज्यपुरस्कार प्राप्त पदविधर शिक्षक तथा मालवण केंद्रप्रमुख शिवराज सावंत उपस्थित होते.
यावेळी दानशुर व्यक्तीमत्व विश्वास मोंडकर व मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवराज सावंत यांनी केले, तर आभार मनिषा ठाकुर यांनी मानले.












