आंबेरी येथे २३ रोजी कामगार नोंदणी शिबीर !

मसुरे (प्रतिनिधी) : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मालवण तालुका व राजन आंबेरकर मित्रमंडळ आंबेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेरी येथे २३ जून रोजी सकाळी १० वाजता कामगार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. असंघटित कामगार यांना संघटित करून त्यांची नोंदणी शासन दरबारी करण्यासाठी, शिबीर आयोजित केले आहे.

नवीन कामगार नोंदणी, वार्षिक रिनिवल, कामगार पाल्यांचे शिष्यवृत्ती याबाबत मार्गदर्शक आणि फॉर्म भरणे, कामगार रोजगार साहित्य, आरोग्य विमा, घरबांधणी अनुदान बाबत मार्गदर्शन व अन्य शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सकाळी उदघाट्न, उपस्थित पाहुण्यांचे मनोगत, मार्गदर्शन होईल यावेळी माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव, चंद्रकांत वालावालकर, स्थानिक पदाधिकारी व मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उवस्थित राहणार आहे. याचा लाभ कामगार बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!